
जामदरी (प्रतिनिधी) शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सराई शिक्षण प्रसारक मंडळ ,जामदरी संचलित, सर्जेराव दादा माध्यमिक विद्यालयात भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातून सर्व विद्यार्थ्यांनी रॅली काढून घोषणा दिल्या.लेझीम पथकाने आलेल्या पाहुण्यांचे वाजत गाजत स्वागत केले.यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. विराजजी इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली तद्नंतर अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली

.यावेळी फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना श्री.महेश इनामदार यांच्यातर्फे आई कै. संगिता सुनीलराव इनामदार यांच्या स्मरणार्थ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विराज दादा इनामदार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्हे देण्यात आले.तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी नंदादीप प्रि प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांवर विविध नृत्ये सादर केली.काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाईले.**स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ ,पालक व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सी.डी. आहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शेवाळे सर, चकोर सर, सुरसे सर, इनामदार सर, निकम सर, पाटील मॅडम, मोरे मॅडम, शेवाळे मॅडम,पगार मॅडम,साबळे भाऊसाहेब, देशमुख बापू,व पवार बापू यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.अशा प्रकारे मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्यदिन विद्यालयात साजरा झाला.
