
मोहाडी :- (बातमीदार) मविप्र संचलित थोरात विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जाधव एस एस यांनी भूषवले. उपस्थित मान्यवरंच्या हस्ते सरस्वती व भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले प्राचार्य मा.शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव तर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण डॉ.चंद्रकांत पाटील यांनी केले. शालेय गीतमंच व संगीत शिक्षक दिलीपजी पागेरे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी कवायत स्काऊट गाईड संचलन व शालेय ढोल पथकाने ढोलपथक सादरीकरण मार्गदर्शक रवी बच्छाव सोनाली खरात राम ढगे स्काऊट गाइड समिती प्रमुख हेमराज गांगोडे ढोलपथक विशाल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांन समोर सादर केले.कार्यक्रमास क्रांतिकारक स्वतंत्र सेनानी भारतमाता व श्रीकृष्णाची आकर्षक वेशभूषा अभिनव च्या विद्यार्थ्यांनी केली होती. ज्ञानेश्वर भवर यांनी अमली पदार्थ विरोधी या मोहिमेची शपथ व प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.

ध्वजारोहना नंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली पर्यावरण संवर्धन अमली पदार्थ विरोधी घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमासाठी सोपानजी राखोंडे साहेब( API दिंडोरी), माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष सुरेश सोमवंशी.उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय जाधव.अभिनव बाल विकास मंदिर अध्यक्ष रामराव पाटील, पालक शिक्षक संघाचे उपअध्यक्ष गोरक्षनाथ गायकवाड शालेय व्यवस्थापन अध्यक्ष दीपक देशमुख माता पालक उपाध्यक्षा स्वाती गोवर्धने अष्टबाहू गोपाळ कृष्ण मंदिर अध्यक्ष मोहाडी उत्तम काका जाधव, शालेय समिती सदस्य एस एस जाधव जवान प्रकाश राऊत, माजी सैनिक राजारामजी देशमुख, चंद्रभानजी कळमकर, शांतारामजी जाधव, वैभव भार्गवे, सर्जेराव देशमुख, शिवाजीराव जाधव .केशव काका जाधव, रामराव जाधव, अशोक कृष्णराव जाधव, बाजीराव देशमख, सतीश जाधव, दिनकर शिंदे, नामदेवराव पाटील, विठ्ठलराव बर्डे मामा, विजय भाऊ जाधव कैलास जाधव,दिलीप जाधव, यतीन जाधव, शांताराम मौले,अरुण वानले, नारायण वाघ, नारायण जाधव,अभिजीत जाधव,सुनिल जाधव,सुजित कळमकर, सचिन भंडारे,अमोल देशमुख,राजेंद्र कळमकर, जालिंदर गोवर्धने, कैलास जोपळे, विजय आहेर,आबा काका जाधव , पर्यवेक्षक पठाडे एस एस, जेष्ठ शिक्षक प्रदीप जाधव उपस्थित आरोग्य कर्मचारी तलाठी ग्रामसेवक आशा सेविका यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते कलाशिक्षक कृष्णा जाधव व धनंजय जाधव यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव व स्वातंत्र्य दिनाचे फलकलेखन केले सूत्रसंचलन ज्ञानेश्वर भवर व गोविंद बैरागी तर उपप्राचार्य गोसावी ए आर यांनी आभार मानले
