
शिरसगाव (प्रतिनिधी). मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय शिरसगाव येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शाळेच्या परिसरात तिरंग्याचे फडफडणारे रंग आणि देशभक्तीपर गीतांचा सुरेल गजर यामुळे वातावरण भारावून गेले होते.याप्रसंगी *नाशिक येथील रोटरी क्लबच्या डायरेक्टर* *व* *एस.एम.आर.के. कॉलेज* *नाशिक महाविद्यालयाच्या प्रा.* *आदरणीय वैशाली चौधरी* *सन्माननीय पाहुणे म्हणून लाभले.* त्यांच्या हस्ते ध्वजपुजन, ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष साहेबराव मोरे हे होते.त्यानंतर राष्ट्रगीत, राज्य गीत,ध्वजगीताचा सामूहिक गजर झाला. मुख्याध्यापिका श्रीमती कडलग मॅडम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्रीमती पवार मॅडम अंमली पदार्थ विरोधी शपथ प्रतिज्ञेचे वाचन केले. मान्यवरांचा परिचय श्री महाले ए.बी. सर यांनी केला. यावेळी शाळेतील मुलांनी मराठी,इंग्रजी मधून अस्सलखित भाषणे सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूरवर सुंदर गीत, देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमाची शान वाढवली, इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पिरॅमिडच्या माध्यमातून योगाचे महत्त्व सादरीकरण करून उपस्थितीचे मने जिंकली.यासाठी मार्गदर्शन शाळेच्या उपशिक्षिका मोरे मॅडम,पवार मॅडम,नवले मॅडम यांनी मेहनत करून घेतली, मान्यवरांची मन जिंकली. भाषणांमधून देशप्रेम, एकता आणि प्रगतीचा संदेश दिला गेला.या कार्यक्रमात, रविंद्र शिरसाठ,लहू मोरे, जनार्दन आरगडे, विष्णू मोरे, विलास जीवरक, रविंद्र बागुल, विलास भडांगे, आव्हाड काका,कराटे ताई, शालेय समितीचे इतर सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, माजी विद्यार्थी आणि इतर मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महाले एस.डी. यांनी नेत्रदीपक पद्धतीने केले, शाळेची माहिती सांगितली. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या, ऐक्याच्या आणि आनंदाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
