
सिन्नर प्रतिनिधी ( सोमनाथ गिरी ) :- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘ हर घर तिरंगा ‘ हा उपक्रम शासकीय आदेशानुसार विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. दि.१३ ऑगस्ट रोजी विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले यांच्या हस्ते तर दि.१४ ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या वरिष्ठ लिपिक राणी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . दि.१५ ऑगस्ट रोजी उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे तर स्काऊट-गाईड ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज होते. विद्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली. स्काऊट मास्टर मारुती डगळे,जयश्री गोहाड,कल्पना शिंदे व क्रीडाशिक्षक शिवाजी गुरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट -गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सिन्नरच्या पहिल्या नगराध्यक्ष मथुराबाई वाजे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्राचार्य रंगनाथ उगले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. उपशिक्षिका जयश्री गोहाड यांनी शासनाच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी शपथ ग्रामस्थ,विद्यार्थी व शिक्षक यांना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर व तालावर पंचरंगी कवायत सादर केली .

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी साक्षी गोफणे व यश वाघ तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळणाऱ्या गौरी वाजे व आरोही जाधव. आदी विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. इस्रो येथे वैज्ञानिक सहलीसाठी देणगी देणारे संदेश वाजे व विशाल वाजे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प.समितीचे माजी उपसभापती शंकरराव वामने,श्रीमंत थोरले बाजीराव पतसंसंस्थेचे व्हा.चेअरमन अरुण वारुंगसे,काशिनाथ वाजे,दामोदर कुंदे, सरपंच रामनाथ पावसे,उपसरपंच सोनाली वारुंगसे,अशोकराव गवळी,अर्जुन वाजे, शरद माळी, अनिल वारुंगसे, विजय वाजे ,कारभारी वारुंगसे,संदेश वाजे, भाऊ वारुंगसे ,पत्रकार सुनील जाधव, तलाठी सत्यम चौधरी ,पोलिसपाटील रामदास वारुंगसे,अर्चना ढोली, प्राचार्य रंगनाथ उगले,पर्यवेक्षिका जयश्री पगारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी तर आभार सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल ससाणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.यावेळी शालेय समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, विविध मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ ,संस्थेचे सभासद ,हितचिंतक व देणगीदार उपस्थित होते.
