
सिन्नर (प्रतिनिधी)०६ जून२०२६ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५३ शिवराज्याभिषेक सोहळा सिन्नर मधील सर्व शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती शिवाजीमहाराज चौकामध्ये साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की
छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतीची प्रेरणा जागृत करून सहयाद्रीच्या डोंगर- दऱ्यात राहणाऱ्या आठरा-पगड जाती- जमाती मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरित झालेला प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी आपले प्राण द्यायला तयार होता. जुलूम अन्याय अत्याचार करणाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम शिवरायांनी केलं. शिवरायांच्या स्वराज्यात जाती -धर्म भेद भावाला थारा नव्हता त्यामुळेच ते रयतेचे राजे होते. अशा या रयतेच्या राजाचे राज्याभिषेक ०६ जून १६७४ ला रायगडा वरती झाला आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज छत्रपती झाले.छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य हे रयतेचे राज्य होतं सर्व धर्म समभाव व सर्वांना समान न्याय या न्यायाने शिवरायांनी रयतेला वागणूक दिली.
या प्रसंगी सामुदायिक शिवशपथ घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आणि कर्तृत्वाचे स्मरण करून मी अशी शपथ घेतो की, शिवरायांच्या विचारांचे मी आयुष्यभर काटेकोरपणे पालन करेन छत्रपती शिवरायांनी माणसांना स्वाभिमानाची शिकवण दिली. अन्याया विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी लढण्याचा मंत्र दिला. समतेच्या मूल्यविचाराला त्यांनी प्रत्यक्षात आणले. सगळ्या जाती – धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची आज्ञा होती की ‘ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा त्यात कोणीही भांडण / बखेडा करू नये’. शिवरायांची ही आज्ञा स्मरणात ठेवून मी कोणत्याही धर्माचा द्वेश करणार नाही. शिवरायांचा मावळा म्हणून मी कधीही जाती – धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही. मी महिलांचा आदर करीन मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलेल्या मानवी मूल्यांना जनतेत रुजविण्यासाठी शिवशपथ मी आज घेत आहे.जय जिजाऊ जय शिवराय अशी शिवशपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश माळी यांनी केले व प्रास्तविक विजय मुठे यांनी केले तर आभार मनोज माळी यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, प्रकाश माळी,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे माळी, राजेंद्र सातपुते चंद्रभान दिवे सोमनाथ लोहारकर प्रकाश परदेशी नितीन शिरसाठ आदी उपस्थित होते
