
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२९७ वा दिवस
भक्तीचा मार्ग हा अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्यात जाण्यात छान आराम आणि मजाही आहे. तो खूप आल्हाददायक आणि आरामशीर आहे. ज्ञानमार्ग म्हणजे एखाद्या खळखळत्या पहाडी नदीला बळाने पलटवून उगमाकडे घेऊन जाण्यासारखा आहे. तो अगदी जलदीचा उपाय आहे, त्याने फार लवकर वस्तुलाभ होतो, पण तो मार्ग फारच कठीण आहे. ज्ञानमार्ग म्हणतो, सर्व प्रवृत्तींचा निरोध करा. भक्तिमार्ग म्हणतो, भगवंताच्या इच्छेच्या प्रवाहात वाहत चला, कायमचे संपूर्ण आत्मसमर्पण करा. हा रस्ता लांबचा आहे खरा, पण त्या मानाने सोपा आहे आणि सुखाचा आहे. भक्त म्हणत असतो प्रभो, मी कायमचा तुझा आहे. आता यानंतर मी जे काही करीन ते सारे तूच करीत आहेस ती सारी तुझीच करणी. आता आणखी 'मी' आणि 'माझे' म्हणून काहीच नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास २० शके १९४८
★ जेष्ठ अधिक वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १० जून २०२६
★ १९३८ सुप्रसिध्द उद्योजक राहूल बजाज यांचा जन्मदिन.
★ १९६६ नाशिक जवळील HAL ओझर येथे “मिग” विमानांची निर्मिती.
★ १९२४ ‘जागतिक दृष्टीदान दिन’.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
