
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल, नांदगावच्या प्रांगणात न्यू इंग्लिश स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, आदर्श प्राथमिक शाळा व बाह्य रुग्ण सेवा कक्ष, नांदगाव या चारही संकुलांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी ध्वज व स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला.
तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण श्री.शरद हनुमान पगार (ज्येष्ठ सभासद मविप्र)तर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण श्री. विजय यादवराव काकळीज (अध्यक्ष-शालेय समिती) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी मंचावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनील बोरसे, आदर्श प्राथमिक शाळा स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.राजाराम गवांदे,श्री.बाळासाहेब कदम, श्री सोपान शिंदे ,श्री पुंजाराम जाधव ,श्री राजेंद्र काकळीज ,श्री अरविंद बोरसे,श्री आबासाहेब सोमवंशी,राजेश पाटील,प्रभाकर कवडे, विजय बडोदे (पत्रकार एस. मराठी न्यूज), मुख्याध्यापिका ज्योती काळे ,प्राचार्य कैलास जाधव, मुख्याध्यापक अविनाश साळंके, बाह्य रुग्ण सेवा कक्ष विभाग प्रमुख प्रज्ञा पगार, अक्षदा कुलकर्णी, जयश्री बोराडे ,पूजा महाजन ,योगिता भाबड ,मनीषा चौधरी,विठ्ठल आहेर ,शरद आहेर, अभय देशमुख, कपिल तेलूरे, प्रकाश फणसे, उपमुखाध्यापक दीपक चव्हाण,सोमनाथ ठाकरे, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ,सर्व सदस्य ,व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक समिती, माता- पालक समिती मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले. याप्रसंगी तुम्ही विद्यार्थी देशाचे भवितव्य आहात चांगले शिक्षण घेऊन चांगले संस्कार अंगीकारून तुम्ही आपल्या देशाची मान जगात उंचवा. आपण सर्वांनी देशभक्ती, सेवाभाव,शिस्त ही मूल्य जपली पाहिजे हे सांगितले.
विद्यालयातील गीतमंचाने ‘जय भारती वंदे भारती’, ‘ए मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले व त्यांना संगीत साथ संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी दिली.
याप्रसंगी देशभक्तीपर गीतांवर कवायत आदर्श प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव च्या विद्यार्थ्यांनी सादर केले व त्यांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील,वाळू बागूल व सोपान सोळूंखे, रविंद्र कदम यांनी केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी क्रीडा, कला, अभ्यास, विज्ञान, आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मविप्र तालुका संचालक, इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील, यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर यांनी केले.
