
लोहोणेर येथील जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करून सलामी देताना मविप्र देवळा संचालक विजय पगार समवेत उपस्थित मान्यवर (छायाचित्र – सुनिल एखंडे)
लोहोणेर-(प्रतिनिधी): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, अभिनव बालविकास मंदिर व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात ७९वा भारतीय स्वातंत्र्यदिन देशभक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार होते तर, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, सरपंच रेश्मा आहिरे, माता पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख, शालेय समिती सदस्य दिगंबर कोठावदे,पंडित निकम, फुला जाधव,रतीलाल परदेशी, डॉ.सुभाष आहेर,संजय सोनवणे,वसंत शेवाळे, योगेश पवार, जितू पाटील,अरुण उशीरे तसेच सर्व सदस्य व्यवस्थापन समिती,शिक्षक-पालक संघ,माता-पालक संघ आदींसह मुख्याध्यापिका कल्पना शिंदे, उप मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे,पर्यवेक्षक व्ही.एम.निकम उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी करत भारतीय स्वातंत्र्य दिनाचा इतिहास आणि पार्श्वभूमी सांगितली. ध्वजपूजनानंतर राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण मविप्र संचालक विजय पगार यांच्या हस्ते, तर स्काऊट -गाईड ध्वजारोहण प्रभाकर झाल्टे यांच्या हस्ते झाले.शालेय मंत्रिमंडळाची पंतप्रधान अनुष्का गवळी हिने अमली पदार्थ विरोधी शपथ दिली. त्यानंतर स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले, तर देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश थोरात यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संस्मरणीय केला.
