
मखमलाबाद विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय ध्वजाचे ध्वजारोहण करताना मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व उपस्थित सर्व मान्यवर.
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शालेय परिसर अतिशय सुंदर अशा रांगोळ्यांनी,तिरंगा माळांनी,फलक लेखनाने, एन.सी.सी.आर्मी व नेव्हलच्या ध्वजांनी सजविण्यात आला होता.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मान्यवरांच्या शुभहस्ते शिवपुतळा व सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. एन.सी.सी.नेव्हल सी.एच.एम. कु.सिद्धार्थ म्हैसधुणे याने प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच सर्व सत्कारार्थी यांचे शाब्दिक अभिनंदन केले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीत मंचाने राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्य गीत सादर केले.अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले यांच्या शुभहस्ते स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शालेय गीतमंचाने स्काऊट गाईड ध्वजगीत व स्काऊट गाईड प्रार्थना सादर केली.पर्यवेक्षक संजय हांडगे यांनी अमली पदार्थ विरोधी दिना निमित्त विद्यार्थ्यांना शपथ दिली.स्वातंत्र दिनानिमित्त मखमलाबाद मधील गौरवशाली,कर्तृत्ववान, दात्तृत्ववान अशा मान्यवर व्यक्तींचा सत्कार मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.यामध्ये डॉक्टर प्रतीक्षा विश्वनाथ पिंगळे यांनी Organizational Managment या विषयात पी.एच.डी.प्राप्त केली.नाशिक जिल्हा माहिती कार्यालयातील छायाचित्रकार मनोज अहिरे यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार प्राप्त झाला.५१,०००/- रुपये रोख,सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सेवानिवृत्त तहसीलदार उदय केशवराव मोरे. सेवानिवृत्त ए.सी.पी.राष्ट्रपती पदक सन्मानित नंदकिशोर केशवराव मोरे,सेवानिवृत्त शिक्षक विलास केशवराव मोरे या मोरे बंधूंतर्फे शालेय साऊंड सिस्टिम साठी २५,०००/- रुपये रोख देणगी देण्यात आली.कु.दर्शन संदीप गवळी व कु.तेजस शंकर गडदे यांनी रोइंग स्पर्धेत वर्ल्ड युनिव्हर्सिटी जर्मनी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

.ग्रेप अँम्बेसीचे संचालक व युवा उद्योजक किरण नामदेव पिंगळे यांचे तर्फे विद्यालयातील गरीब व गरजू अशा १०२ विद्यार्थ्यांना ३०,०००/- रुपयांचे शालेय बुटांचे वाटप करण्यात आले. मखमलाबाद नागपंचमी यात्रेतील मानाच्या शेवटच्या कुस्तीचे विजेते उदय वाळू काकड यांनी २१,०००/- रुपये रोख व गदा मिळविली.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका भाग्यशाली जाधव व शालेय विद्यार्थी यांना वाढदिवसानिमित्त तसेच माजी सैनिक,विद्यालयाचे उपशिक्षक पुंडलिक बडवर यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सुंदर असे देशभक्तीपर नृत्य सादर करण्यात आले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी आपल्या मनोगतात शालेय प्रगतीचा आढावा घेतला व सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छापर संदेश दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे व अनिल पगार यांनी केले.कार्यक्रमास उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले,होरायझन शालेय समितीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,मविप्रचे माजी संचालक सचिन पिंगळे,नगरसेवक पुंडलिकराव खोडे,रामचंद्र अर्जुन काकड सर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस संजय फडोळ,ज्येष्ठ सभासद विश्वनाथ पिंगळे,मदनराव पिंगळे,चंद्रभान पिंगळे,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,मधुकर पिंगळे, शांताराम पिंगळे,परसराम पिंगळे, नरेंद्र मुळाणे,ज्ञानेश्वर पिंगळे, साहेबराव पिंगळे,बाळासाहेब पिंगळे,मोतीराम पिंगळे,देविदास घाडगे,नारायण पिंगळे,जगन्नाथ पिंगळे,रामदास तिडके,रमेश माळी,नितीन पिंगळे,योगेश काकड,प्रमोद पालवे,अंकुश काकड,मयूर पिंगळे,शिवाजी पिंगळे,कल्पना पिंगळे,आत्माराम भोर,पांडुरंग शिंदे,डॉ.जगन्नाथ तांदळे,चित्रा तांदळे,दिगंबर पिंगळे,भास्कर थेटे,अजित ताडगे,बाळासाहेब काकड,प्रदीप पिंगळे,पोपटराव बोराडे,शिवाजी हेंगडे,शिवव्याख्याते समाधान हेंगडे,चंद्रकांत काकड,प्रभाकर फडोळ,बाळासाहेब गवळी, गोरख तिडके,भारत थोरात,भूषण शिंदे,योगेश पिंगळे दिलीप पताडे,पोपट तिडके,रोहन काठे,शंकर गडदे,विठ्ठल पिंगळे, मविप्र सभासद,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,प्राचार्य संजय डेर्ले,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा आहेर,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे, जूनियर कॉलेज प्रमुख विकास थोरात,एनसीसी आर्मी ऑफिसर अशोक गावले,नेव्हल ऑफिसर दयाराम मुठाळ,स्काऊट प्रमुख बाळासाहेब पवार,शालेय पंतप्रधान आकांक्षा कथार,सर्व प्राध्यापक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर

कर्मचारी,एन.सी.सी.आर्मी,नेव्हलपथक,आर.एस.पी.पथक, स्काऊट गाईड पथक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
