
सिन्नर ( प्रतिनिधी) मातोश्री चांडक कन्या विद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा सैनिक नारायण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.प्रतिमापूजन प्रमुख पाहुणे, शालेय समिती अध्यक्ष, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे, माजी पर्यवेक्षक दीपक बाकळे, पालक सदस्य पोपट इलग, शिक्षक प्रतिनिधी उत्तम भोये व चित्रा क्षत्रिय यांनी केले.प्रमुख पाहुण्यांनी सैनिक जीवनातील अनुभव सांगितले. अध्यक्षांनी पर्यावरण संवर्धनही देशसेवा असल्याचे प्रतिपादन केले.

मुख्याध्यापिकांनी ध्वजाचे महत्त्व पटवून दिले. सुवर्णा सोनवणे यांनी ध्वज प्रतिज्ञा व उत्तम भोये यांनी अंमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा दिली.शालेय राष्ट्रपती अमोली जाधव हिच्या नेतृत्वाखाली शपथविधी झाला. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत कवायत, भाषणे, समूहगीत झाले.विद्यार्थिनी स्वरा सोनवणे ( शिष्यवृती ,विज्ञान प्रकल्प), प्रांजल काळे (शिष्यवृती ), इतरांनी विविध क्षेत्रात यश संपादन केले म्हणून गौरव झाला.

ज्ञानयात्री त्रैमासिक प्रकाशन, वृक्षारोपण व खाऊवाटपाने सोहळा संपन्न झाला.सूत्रसंचालन नीलिमा दुसाने,राजहंस माळी यांनी केले
