
नायडोंगरी. ( प्रतिनिधी) आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, लोकनेते कै. अँड. विजय शिवराम आहेर हायस्कुल व ज्युनियर काँलेज नायडोंगरी विद्यालयात* *भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये विद्यार्थ्यांची कवायत घेण्यात आली तद्नंतर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले विद्यालयाचे माजी विद्यार्थी वायुदलातील लान्स नायक श्री. संतोष सावळीराम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनानिमित्त फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार आयोजित करून मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्हे देण्यात आले. तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.*

काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाईले. विद्यालयाच्या प्राचार्या सन्माननीय सौ पी व्हि आहेर मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण केले व कार्यक्रमाची सांगता झाली.**स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस विलासराव आहेर, मा. आमदार अनिलकुमार गंगाधर आहेर व गावातील इतर प्रतिष्ठित नागरिक डॉ. राजेंद्र आहेर, डॉ.विष्णू आहेर, गणेश मोरे, शांताराम जाधव, मुस्ताक शेख, शंकर आहेर, रमजान शेख, विठ्ठल साळुंखे, सावळीराम जाधव, राजेंद्र आहेर, अनिल पवार, ज्ञानदेव आहेर, जालिंदर आहेर , साहेबराव आहेर, धनंजय पाटील, एकनाथ राठोड, बद्रीनाथ बत्तासे, भाऊसाहेब जाधव, सुदाम कासार, दादाभाऊ आहेर, इकबाल खाटीक, रवींद्र शिंदे, गणेश आहेर, संजय आहेर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नशा मुक्तीची शपथ या वेळी घेतली.अशा प्रकारे मोठ्या उत्साहात भारतीय स्वातंत्र्यदिन विद्यालयात साजरा झाला.
