
श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था वसंत नगर जातेगाव.(प्रतिनिधी) संचलित माध्यमिक विद्यालय रोहिला बुद्रुक तालुका नांदगाव येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जे. एस. जाधव मॅडम यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ ठकुबाई पवार तसेच उपसरपंच सुनंदाताई बागुल व शिवानंद सूर्यवंशी सर हे उपस्थित होते . स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अवयवादानाची शपथ देण्यात आली त्याच बरोबर अमली पदार्थ सेवन विरोधातही शपथ घेण्यात आली स्वतंत्र दिनाच्या या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ व बहुसंख्येने पालक उपस्थित होते

संस्थेचे अध्यक्ष श्री. एस जी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक बीएस सोनवणे सर यांनी केले. आभार प्रदर्शन जे डी जाधव सर यांनी केले.
