
साकोरा (प्रतिनिधी ) पेङकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालय साकोरे विद्यालयात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहन स्कुल कमेटी चेअरमन रमेश झेला बोरसे यांच्या हस्ते व ध्वज पूजन माजी विद्यार्थी भारतीय सैनिक समाधान बाबुराव मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत , राज्यगीत , ध्वजगीत , पसायदान घेण्यात आले तसेच देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे स्कुल कमेटी सदस्य , पेङकाई संस्थेचे संचालक विलास बोरसे सर , बबनशेट अमृतकर , चंद्रभान सोनवने सर , बाजीराव सुलाने , प्रल्हाद निकम , भालचंद्र बोरसे , सुर्यभान बापू बोरसे , अरुन बोरसे , एस एल बोरसे , आरोग्य अधिकारी , आशा सेविका , पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. बबनशेट अमृतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन दिल्यात. तसेच इयत्ता १० प्रथम , व्दितीय , तृतीय येणाऱ्या विद्यार्थी यांना विद्यालयाकङून पारितोषिक देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे संचलन क्रिङाशिक्षक बोरसे आर बी , क्षीरसागर सर,भाबङ सर ,श्रीमती पूनम बोरसे मँङम , सुरसे सर , बोरसे व्ही पी , बोरसे एस एस , बोरसे ए आर , बोरसे एम एन सर ,बी के बोरसे , आर बी बोरसे , श्रीमती पवार मँङम , श्रीमती रंधे मँङम व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते*
