
नांदगाव ! (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील डोंगरावर दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव देवस्थानच्या ठिकाणी येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील भाविकांच्या दिंडीतील ट्रॉलीची ट्रॉली पलटी झाल्याने देविदास दौलतराव सोनवणे वय वर्ष 55 यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर पंढरीनाथ जाधव वय वर्ष 65 यांच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तर इतर तीन जनावर बोलठाण येथील पाटण आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी दुसऱ्या दवाखान्यात हलविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील भाविकांच्या दिंडीतील ट्रॅक्टरची ट्रॉली ही नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील जातेगाव पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेव डोंगरावरील परतीच्या प्रवास करते वेळी डोंगर उतारावर पलटी झाल्याने ट्रॅक्टर ट्रॉली खाली दबून एका वयोवृद्ध भाविकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. दिंडीतील एक भाविक मृत्यू व चार भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारासाठी खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने भाविकांमध्ये एकच कळबळ उडाली होती. या घटनेने भाविकांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेची माहिती परिसरात कळतच हळहळदत्त करण्यात येत होती. नांदगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. श्री महादेव डोंगरावरील श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येवला तालुक्यातील उंदीर वाडी येथील भाविकांची दिंडी स्त्री पिनाकेश्वर महादेव डोंगरावर गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी आली होती. देव दर्शन, धार्मिक विधी, भोजन आटोपल्यानंतर दिंडीतील भाविक परतीच्या प्रवासास लागले होते. परंतु महादेव डोंगर उतारावर 14 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारी तीन वाजेच्या सुमारास श्री शेत्र पिनाकेश्वर महादेव देवस्थान डोंगर उतारावर येवला तालुक्यातील उंदीर वाडी येथील भाविकांचा दिंडीतील ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने दिंडीतील भाविक देविदास दौलतराव सोनवणे वय वर्ष 55 हे उपचारापूर्वीच मयत झाले तर पंढरीनाथ जाधव वय वर्ष 62 यांना छातीला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून अन्य तिघांवर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदगाव येथे पाठविण्यात आले. शंभर ते दीडशे पेक्षा अधिक भाविकांचा दिंडी सोहळा श्री पिनाकेश्वर महादेव देवस्थान येथे गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास आला होता. देवस्थानच्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आटोपल्या नंतर परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर त्यातील एक ट्रॅक्टर स्वयंपाकाचे भांडे व इतर साहित्य घेऊन देवस्थान डोंगर घाटातील उताराच्या ठिकाणी घाट उतरत असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने त्यात देविदास दलोतराव सोनवणे वय वर्ष 55 यांना गंभीर मार लागल्याने त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. तर पंढरीनाथ जाधव वय वर्ष 62 यांना छातीला व डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. आणि राधाकिसन शिरसागर वय वर्ष 60, साई पवार वय वर्ष 16, कृष्ण धामणे वय वर्षे 14 सर्व राहणार येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रथमोउपचार करून सोडण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बोलठाण येथील पोलीस औट पोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बस्ती व पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी नागरिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलविले. या दुर्दैवी घटनेची खबर उंदीरवाडी तालुका येवला येथे कळतच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
