
नांदगाव-15 ऑगस्ट 2025नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेशजी कवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी शालेय क्रीडा शिक्षक अशोक बागूल व संजय त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळ, हाऊस कॅप्टन व टीमने संचलन केले.या कार्यक्रमात मागील

शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले
.जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलच्या
1) रसिका मेडतिया
2) श्रावणी गायकवाड
3) क्रांती इंगोले
या विद्यार्थिनींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.तर सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील
1)पूनम वाबळे
2)ओम खैरनार
3)ओमकार क्षीरसागरया
विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.तसेच मागील वर्षातील इयत्ता नववीच्या वर्गात प्रथम आलेल्या जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलचे विद्यार्थी
1) यथार्थ नाईक
2) प्रियांश अग्रवाल
3) अर्णव अग्रवालतर सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील 1)अथर्व महाजनया विद्यार्थ्यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या जे टी. कासलीवाल स्कूलच्या विद्यार्थ्यांचाही यावेळेस सन्मान करण्यात आला यामध्ये गट १ : इयत्ता ५ वी ते ७ वी.१) कु. व्रिंदा जितेंद्र पटेल (इयत्ता ७वी)🏆 प्रथम क्रमांक ट्रॉफी + रोख रक्कम रु-२०००/- + प्रमाणपत्र२) कु. प्रविषा कुणाल कासलीवाल (इयत्ता ५वी.)🏆 द्वितीय क्रमांक ट्रॉफी + रोख रक्कम रु-१५००/- प्रमाणपञगट २ : इयत्ता ८ वी ते १० वी.१) कु. मोक्षा निलेश पारख (इयत्ता ८ वी)🏆 प्रथम क्रमांक पारितोषिक+ रोख रक्कम ₹-२०००/- + प्रमाणपत्र त्याचबरोबर राज्यस्तरीय आंतरशालेय वादविवाद स्पर्धेत जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) ने उल्लेखनीय कामगिरी करत दुसरे पारितोषिक पटकावले. त्यामध्ये इयत्ता नववीच्या 1)कु.अन्वेषा उदय मेघावत व २)कु आर्या ललित पगार त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेला ₹७१०० चे रोख पारितोषिक,ट्रॉफी प्रमाणपत्रांसह मिळाले.तसेच जिल्हास्तरीय अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता चौथीच्या जे.टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच सर्वोत्कृष्ट वक्त्याचा करंडक, वैयक्तिक करंडक व रू ५,१०० रोख होते आणि प्रमाणपत्रे मिळविले. या स्पर्धेत यश संपादन करणारे विद्यार्थी होतेः •कु. श्रृष्टी शरद पवार, कु. श्लोक सुशील फोफलिया या या विद्यार्थ्यांना देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थांना भगवान नाईकवाडे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.त्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी सादरीकरणामुळे शाळेचा गौरव आणि अभिमान वाढवला आहे. वर्धा या ठिकाणी आयोजित CBSE क्लस्टर 9th टेबल टेनिस टूर्नामेंट 2025.साईप्रसाद पाटील व आयुष पारखे तसेच श्रावणी गायकवाड या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ खेळल्याबद्दल त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे वुशू जिल्हा स्पर्धेत जे.टि कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल नांदगाव मधील 1️⃣ मिष्टी अग्रवाल (गोल्ड मेडल )
2️⃣ श्लोक खैरनार (गोल्ड मेडल)
3️⃣ पृथ्वीराज गायकवाड (गोल्ड मेडल)
4️⃣ अक्षदा सोनवणे (गोल्ड मेडल)
5️⃣जिनेशा गादीया (सिल्वर मेडल)
6️⃣देवांशी जोशी.(सिल्वर मेडल)
7️⃣ प्रताप गायकवाड (सिल्वर मेडल)
8️⃣ स्वरा जाधव (सिल्वर मेडल)
9️⃣सोहम जाधव (सिल्वर मेडल).
🔟 शिवराज बच्छाव (गोल्ड मेडल)
हे विद्यार्थी विजयी होऊन या मुलांची स्टेट लेवल साठी निवडत्याचप्रमाणे संगणक विषय शिक्षक वासुदेव आहेर व क्रीडा शिक्षक अशोक बागुल यांना आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालयातील गौरव राऊत व खुशाली शिंदे या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य शूटिंग बॉल संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
तसेच 2025 मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत सौ.क.मा. कासलीवाल प्राथमिक विद्यालयातील खालील यशस्वी विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.यातइयत्ता पहिली
1)शौर्य श्रीकांत खैरनार
2)आदिश्री विजय गायकवाडइयत्ता
2 री1)ध्रुव दगडू पाटील
2)अनुराग राजू अहिरे
3)श्रावणी नंदकिशोर दौंडइयत्ता
तिसरी1)तनिष्का देशमुख
तसेच नमो एज्युकेशन फाउंडेशन पुणे जिनियस मॅथ परीक्षेत इयत्ता तिसरीचे विद्यार्थी चैतन्या कट्यारे जिल्ह्यात चौथा क्रमांक व अमीन साजिद शेख व इयत्ता चौथीचे रुद्र नंदू जाधव जिल्ह्यात पाचवा क्रमांक व हर्षदा गणेश वाबळे या विद्यार्थांनी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविल्या बद्दल सन्मानित करण्यात आले.
यानंतर तनिष्का देशमुख , लावण्या जगधने,चारू यादव या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात देशभक्तीपर गीत ,नृत्य,सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच
जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलची प्रविषा कासलीवाल हिने सुंदर देशभक्तीपर गीत गायन केले.संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यालयाच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच आपले परिश्रम, दूरदृष्टी आणि न थकणाऱ्या जिद्दीने शाळेचा लौकिक उंचावणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेशजी कवडे,संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, संस्थेचे उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल , सचिव -विजय चोपडा,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल,आनंद कासलीवाल तसेचअंकुर कासलीवाल,अभिजीत कासलीवाल, प्रतिक कासलीवाल,कमलेश कासलीवाल,कुणाल कासलीवाल, श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल , प्रमिलाताई कासलीवाल,मयुरीताई कासलीवाल, प्रिन्सिपल मनी चावला मुख्याध्यापक सर्वश्री गोरख डफाळ, विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार व प्रियंका पवार यांनी तर चांदणी पारख यांनी आभार व्यक्त केले.
