
सरताळे -(प्रतिनिधी) ग्रामीण विकास शिक्षण संस्था नाशिक संचलित अनु. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सरताळे ता. नांदगाव येथे आज 79 वा स्वातंत्र्य दिन उत्सहात संपन्न झाला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते भारत माता व स्वतंत्र विरांच्या प्रतिमीचे पुजन व राष्ट्रध्वजाचे पुजन करण्यात आले. संस्था विश्वस्थ रचना दीदींच्या हस्ते ध्वजा रोहन होऊन, ध्वज मानवदंना देण्यात आली नंतर आश्रम शाळा विद्यार्थ्यांनी सामुहिक राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वज गीत व देश भक्तीपर गीताच्या तालावर कवायत सादर केली. शिक्षण शास्त्र महाविद्यालय छात्र शिक्षक,शिक्षिकांचे देशभक्तीपर गीत, भाषणे व आश्रम शाळा विद्यार्थिनी संजीवनी दळवीच्या देशभक्तीपर गीताने वातावरण देशभक्तिमय झाले नंतरभारत सरकार नशा मुक्ती अभियान अंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्था कोषाध्यक्षा श्रीम. नम्रता शेवाळे मॅडम होत्या तर श्री सिद्धी विनायक शिक्षण शास्र महाविद्यालय प्राचार्य घुगे, सुरसे सर व आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी,बबन शेठ,विद्यार्थी पालक काशिनाथ दळवी प्रमुख उपस्थिती होती. सदर प्रसंगी आश्रम शाळा प्राचार्य समाधान चौधरी यांनी तरुण शक्ती ही राष्ट्र शक्ती असुन तरुणांनी व्यसन व फॅशन च्या आहारी न जाता उद्योग, व्यवसाय व शिक्षणाची कास धरीत आत्मनिर्भर,विकसित भारताचे आधार स्तंभ बनण्याचे आव्हान केले.कार्यक्रम प्रास्ताविक महेंद्र जाधव यांनी मांडले तर सुत्रसंचालन दिपक सुर्यवंशी यांनी सांभाळेल. कमांड्स व कवायत संचलण श्री भगवान हिरे यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी पालक, शिक्षण शास्र महाविद्यालय विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलीत.
