
मुंगसरे (नाशिक): देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मंगसरे ग्रामपंचायतीत मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच रामदास उगले, ग्रामसेवक प्रवीण भवरे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब म्हैसधुने तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले. गावातील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची नोंद घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथील अंतिम वर्षाचे विद्यार्थी मयुर रायसिंग, आदित्य राजपूत, संधान ओमकार, संधान आविष्कार, अंगत पाटील, पवार पियूष आणि महेशकुमार पाटील यांनी केले.ग्रामपंचायतीत यावेळी स्वच्छता अभियान, पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारण याबाबत जनजागृती करण्यात आली. शेवटी उपस्थितांनी एकदिलाने “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणा देत कार्यक्रमाची सांगता केली.कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा.के.एस.बंदी, संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चेंट, चांगदेवराव होळकर, विश्वस्त व प्राचार्य डॉ. के.एन. नांदुरकर, डॉ.एस.एस.साने, शकुंतलाताई वाघ, डॉ.व्ही.एस. माने, एस.जी ठाकरे, डॉ.प्रीती भामरे, व कॅम्पस समन्वयक डॉ.व्ही.एम.सेवलीकर, प्राचार्य डॉ.एस.एस.हाडोळे, प्रा. तुषार उगले, प्रा.परमेश्वरी पवार, प्रा.दीपक पाटील, प्रा.ज्योती मोटे, प्रा.सोनोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
