

मोरेवाडी ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी( कासारी) येथे भारताचा “७९”वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे ध्वजारोहण नांदगाव येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर उदयजी मेघावत यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय ध्वजास सलामी देऊन राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. देशभक्तीपर कवायतीचे संचलन करण्यात आले.अंमलीपदार्थ विरोधी सामुदायिक शपथ घेण्यात आली.प्रमुख पाहुणे दंतचिकित्सक डॉक्टर उदयजी मेघावत यांनी वैयक्तिक स्वच्छता,दातांचे आरोग्य देशभक्ती,शिक्षणाचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना उद्बोधन केले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर उदयजी मेघावत व शिवाजी पाटील यांचा शाळेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला.डॉक्टर उदयजी मेघावत यांनी भेटवस्तू म्हणून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,पालक,ग्रामस्थ शाळेचे शिक्षकवृंद,अंगणवाडी कार्यकर्ती,मदतनीस व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कासारी शाळेचे शिक्षक भरत पवार सर यांचे विशेष परिश्रम लाभले.
