
१५ ऑगस्ट भारतीयांसाठी अभिमानचा दिवस, याच दिवसा करिता भारतीयांनी शेकडो वर्षे स्वप्न पाहिलीत. प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्य घोषित होतांनाही भारताने खुप काही भोगले. भारत एक संघ रहावा म्हणुन खुप अडचणीना तोंड द्यावे लागले. त्यात झालेल्या काही चुकांचे परिणाम आजही भारताला भोगावे लागत आहे.परंतु त्याची जाणिव आजच्या जनतेला व शासनकर्त्यांना खरच आहे का?ज्या स्वातंत्र्य विरांनी आहुती दिली, ज्यानी अतोनात हाल सोसुन स्वातंत्र्य मिळवुन दिले. अशा त्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत हाच आहे का?आजही १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला ध्वजवंदनास न जाता सुट्टी एंजॉय करणारे (सुज्ञ ?)नागरीक आहेत. किती जणांना राष्ट्रगीत पाठ आहे.( जरा थांबा मनातल्या मनात राष्ट्रगीत म्हणुन बघा.) आज सुध्दा बरेच महाभाग राष्ट्रगीत चालु असतांना गप्प असतात. आज आपण याचे भान ठेवुन वागतो का? आजही आमचे सैनिक सिमेवर डोळ्यात तेल घालुन, जिवाची पर्वा न करता देशाचे रखण करीत आहेत. याची जाणिव आम्हाला आहे. उलट सैनिकांच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करतात.किती (सुज्ञ ?)नागरीक मतदान करतात? ज्याला मत देतो तो त्या लायकिचा आहे का? हे आपण तपासुन मत देत असतो का.?खरच स्वातंत्र्याच मोल आपण जाणतो का?स्पष्टपणे सांगायचं तर नाही!आणि तेवढी आपली लायकीसुद्धा नाही.भारताला स्वातंत्र्य देण्याची घाई करू नका. ते लोक ५० वर्षांतच त्याची वाट लाऊन टाकतील, असं विन्स्टन चर्चिल म्हणाला होता. त्याचे हे उदगार खुळेपणाचे आणि अहंकाराचे प्रतिक होते, पण दाखवलेच की नाही आमच्या लोकांनी खरे करून दाखविले आहे .राष्ट्रगीताचा मान राखणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. लोकशाहीसारखी दुसरी व्यवस्था नाही. जगातील कोणत्याही देशाचे तेथील हुकूमशहाने भले केलेले नाही. मुस्कटदाबी हा हुकूमशहांचा एकमेव कार्यक्रम असतो. या लोकशाहीचा वापर करून काही विचारवंत मंडळी आपल्या देशाच्या काही सन्मान्य गोष्टींवर हल्ला चढवताना दिसतात. राष्ट्रगीत चालू असताना उभे राहणे म्हणजेच देशभक्ती आहे काय? यासारखे बालिश व निरर्थक प्रश्न या मंडळीकडून विचारले जातात.राष्ट्रगीताचा मान म्हणजे राष्ट्रनिष्ठेची अभिव्यक्ती असते. गीत बनण्यापूर्वी ते साधे शब्द असतात. ते एका रचनेत बसवले की त्याचे सुंदर गीत बनते. त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली की त्या गीताला सर्वोच्च स्थान प्राप्त होते. राष्ट्रध्वजाचेही तसेच असते. तो बनतो तेव्हा ते एक फडके असते, परंतु त्याला मान्यता दिल्याने ते राष्ट्राचे सर्वोच्च प्रतीक बनते. हे समजूनही न समजण्यासारखे वागणारे लोक आपल्या देशात आहेत. कोणताही उपासना पंथ वा धर्म असो, त्याचे स्थान वैयक्तिक जीवनात आहे असे म्हणणारेच धर्माला देशाच्या विरोधात पेटवले जात असताना शांत बसतात. राष्ट्रधर्मापेक्षा दुसरा कोणताही धर्म नाही व राष्ट्रनिष्ठेपेक्षा श्रेष्ठ कोणतीही निष्ठा नाही. ज्याच्याकडे राष्ट्रनिष्ठा नाही त्याला जीवननिष्ठा नाही म्हणूनच तो भरकटत कुठेही जात असतो. राष्ट्रगीताचा मान राखणे हे केवळ कायद्याने आपले कर्तव्य ठरत नसून नैतिकदृष्ट्याही ते आपले कर्तव्य आहे, हे सर्वजणांनी ध्यानात ठेवले पाहिजे.मात्र आपण भान ठेवतो का.? हा खरा प्रश्न आहे.राष्ट्रगीताप्रमाणेच राष्ट्रध्वजाचा सन्मान करणे हे देशातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे गीत. आपल्या मनात आपल्या राष्ट्राविषयी जे प्रेम वाटते, जो आदर वाटतो ते व्यक्त करणारे हे गीत. प्रत्येक देशाचे आपापले राष्ट्रगीत असते. राष्ट्रगीत म्हणजे आपल्या राष्ट्राचा मानबिंदू. म्हणून ते म्हणताना ताठ व स्तब्ध उभे राहायचे असते.राष्ट्र ध्वजाचा सन्मान राखला जावा म्हणून ध्वजसंहिता तयार करण्यात आली आहे.राष्ट्रध्वज फडकवताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे,याचा स्पष्ट उल्लेख ध्वज संहितेत करण्यात आलेला असताना देखील ध्वज संहितेचा सन्मान आपण राखतो का.? भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे.घरोघरी तिरंगा हा उपक्रम संपुर्ण देशवासियांना राबवायचा आहे.हा उपक्रम राबवताना अनेक तिरंग्याचा सन्मान राखायचा आहे.मात्र अनेक ठिकाणी झेंड्याचा अनादर होत आहे.जे राष्ट्रगीताचे तीच दशा मतदानाबाबत सांगता येईल.मतदान करणे सुद्धा देशसेवेचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.लोकशाहीत सरकारची निर्मिती अभिव्यक्ती व क्रियांवयन लोकमतातून होत असते.लोकमत व्यक्त करण्याचे एक महत्वाचे माध्यम म्हणजे मत.म्हणून मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी,समृद्ध करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे व मतदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवून घेणे हा देशसेवेचा व राष्ट्रीय कर्तव्याचाच एक भाग आहे. लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळण्यास, विकासाला गती येण्यास भरीव मदत होते. याच दृष्टीकोनातून या देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावणे नितांत गरजेचे आहे. किंबहूना मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य बजावणे होय. मतदान करणे, मतदाना पासून वंचीत राहणे, मतदानाच्या सुट्टीचा उपभोग घेणे ही प्रवृत्ती नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये मतदाना प्रति निरुत्साह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो.. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया…, कुठेतरी सहल काढुया.. हे विचार म्हणजे मतदाना प्रति निरुत्साहच होय..लोक मतदानाच्या कर्तव्याविषयी उदासीन आहेत. उलट ज्यांना अधिकार असू नयेत असे म्हटले होते ते मात्र कसलाही आळस न करता मतदान करताना दिसतात. अशी ही विपरीत स्थिती आहे. आपले मत कोणालाही असो किंवा ते आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य लोकशाहीप्रती, देशाप्रती किंवा कोणत्या पक्षाप्रती नसते तर ते आपल्याप्रती असते, आपल्या हितासाठी असते. ही जाणीव ठेवून आवर्जुन मतदान केले पाहिजे. आपले पुढचे पाच वर्षांचे आयुष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते कारण आपल्या देशाचा कारभार पाहणारे कारभारी आपण मतदानातून निवडत असतो. मतदानाच्या अधिकाराचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. भारताची लोकशाही ही लोकांनी चालवलेली राज्यपद्धती आहे. पण देशातला प्रत्येक नागरीक लोकसभेत/ विधानसभेत जाऊन राज्य कारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणून त्याने आपले प्रतिनिधी लोकसभेत/ विधानसभेत पाठवून त्यांच्यामार्फत देशाचा कारभार पहावा अशी अपेक्षा आहे. हे प्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि लोकांच्या हिताचा होईल. मात्र याबाबतीत प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले मत व्यक्त केले पाहिजे. जे लोक मतदान करणार नाहीत ते देशाच्या कारभाराच्या बाबतीत उदासीन आहेत असे म्हणावे लागेल. ही उदासीनता झटकून प्रत्येकाने आवर्जून मतदान केले पाहिजे.लोकशाहीत प्रत्येक मतदार नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क तर बजावलाच पाहिजे ,मात्र या अधिकाराचा वापर करताना कोणत्याही आमिषाला मतदारांनी बळी पडू नये.पैसे न घेता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने योग्य त्या उमेदवाराला मत देणे ही जबाबदारी मतदाराची आहे.याच बरोबर उमेदवाराला मतदेण्याआधी त्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करणे,आधी निवडून दिलेल्या उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली आहे किंवा नाही याची समीक्षा करून चांगल्या लोकप्रतिनिधींचा शोध घेऊन मतदान करणे,ही सुद्धा मतदातांची फार मोठी जबाबदारी आहे.मात्र ही जबाबदारी आपण इमाणे इतबारे पार पाडतो काय..?याच आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहेभारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी सामान्य भारतीय जनतेने प्रचंड लढा दिला. काहींनी हिंसेचा मार्ग पत्करला तर बहुतेकांनी अहिंसेचा. उद्देश एकच होता, भारताला स्वतंत्र करणे. भारत ही माझी जन्मभूमी आहे म्हणून कित्येकांनी प्राण पणाला लावले, सर्वस्व अर्पण केले. तुरुंगवास, छळ सोसले, लाठया खाल्या. सर्वांनी एकत्र मिळून स्वातंत्र्य मिळविले. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. परंतु, आदर्श स्वराज्याचे आपले स्वप्न अजून पूर्ण झालेच नाही. त्यासाठी जे मूल्य द्यायला हवे, जो प्रयत्न करायला हवा, तो आपण पूर्ण क्षमतेने केलाच नाही. आमची देशभक्तीची भावना पातळ झाली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर स्वातंत्र्य मिळविले खरे! पण त्यानंतर आम्ही आमची संस्कृती आणि इतिहास विसरत चाललो. जो देश आपली संस्कृती विसरतो तो विकृतींच्या अधीन होतो आणि जो देश आपला इतिहास विसरतो,तो देश आपला भूगोलही बिघडवतो. म्हणूनच मोगलाईतील बुजूर्ग मंडळी अधूनमधून ’मोगलाई बरी होती रे’ असे तर ब्रिटिश अंमलाखालील समवयस्क मंडळी ’इंग्रजी राजवट चांगली होती’ असे हताशपणे म्हणताना आढळतात. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही असे जरी म्हणता येत नसले तरी त्याचे समर्थन कदापिही होऊ शकत नाही. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीने जखडून टाकलेल्या देशाच्या मानसिकतेतून स्वाभिमानी, लोककल्याणकारी, राष्ट्रप्रेमी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादिंच्या निर्माणाचे काम अजुन अपूर्ण आहे. हे काम एकट्या सरकारचे नाही, केवळ नागरिकांचेही नाही. दोघांनी मिळुन त्यासाठी सातत्त्याने प्रयत्न करावे लागतील. शासनप्रणाली व नागरिक यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य असायला हवे. शासनकर्ते जे कार्यक्रम ,योजना हाती घेतील त्याच्या दूरगामी परिणामांचा, राष्ट्रहिताचा विचार झाला पाहिजे. आम्ही निवडून दिलेले सरकार हे आमचे आहे असे जनतेला, व ज्यांनी आम्हाला निवडून दिले ती रयत आमची आहे असे शासनकर्त्यांना, मनापासून वाटले पाहिजे. समाज घटकांना एकमेकांविषयी विश्वास, आपुलकी व ममत्व वाटले पाहिजे. आम्ही सारे एक आहोत, एक राहू अशा प्रेरणेने जगले व वागले पाहीजे. असे ज्यावेळी होईल, त्यावेळी मतदानासाठी व इतर कुठल्याही कामासाठी लाच देणे घेणे आपोआपच बंद होईल, कारण मी ज्याला आपला मानले त्याला लाच देणे किंवा त्याच्याकडून घेणे संभवत नाही. भारताच्या पुनर्निर्माणासाठी कर्तृत्वसंपन्न माणसांची नितांत आवश्यकता आहे.९५६१५९४३०६
