
कोपरगाव (प्रतिनिधी ) ‘व्हाईस ऑफ मीडिया‘ कोपरगाव तालुक्याच्या वतीने आयोजित “विद्यार्थी गुणगौरव सोहळा” कार्यक्रमात माननीय खासदार, लोकनेते भाऊसाहेब जी वाकचौरे यांच्या समवेत उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थांना पारितोषिक प्रदान करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील थोर दानशूर आदरणीय नानजीभाई ठक्कर, प्रमुख उपस्थितीत पुणे येथील राष्ट्रसंत ज्ञानेशानंद शास्त्री‘जी महाराज आणि प्रमुख अतिथी म्हणून राहाता तालुक्यातील सौ.प्रतिभा काकी घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात कोपरगाव तालुका पत्रकार बांधवानी एकत्र येत गुणवंत विद्यार्थांचा केलेला गौरव खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला प्रेरणा देणारा असून यात विशेषतः श्री.तान्हाजी मामा लामखडे आणि श्री. प्रशांत जी टेके यांनी उस्फुर्तपणे केलेल्या सुंदर नियोजनाबद्दल मनापासून अभिमान वाटतो. प्रामाणिक पत्रकारिता जपत आपण समाजासाठी कांही चांगलं करू शकतो, या भावनेतून आपल्या परिसरातील नव युवक-युवतीसाठी घेतलेला प्रेरणादायी कार्यक्रम नक्कीच समाजाला दिशा देणारा आहे, यात शंका नाही.यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि यातून शिक्षणाचं महत्व पटवून देण्यात आलं.
