
नांदगाव (प्रतिनिधी) नांदगाव येथे आ. सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे आज 105 नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडे व सुरक्षा संच वाटप करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित कामगार बंधू भगिनींना दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त भांडी संच तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक बांधकाम कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळवून त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणारा आधार मिळाला यावेळी शिवसेना नांदगाव शहर प्रमुख सुनील जाधव भाऊराव बागुल इनके राठोड तानसेन जगताप महेंद्र आहेर चेतन मोरे कल्पेश निकम आदीं बांधकाम कामगार बांधव व भगिनी उपस्थित होते
