
मालेगाव ( प्रतिनिधी )मालेगाव. येथील सुप्रसिद्ध राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय कवी,लेखक,समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांना त्यांच्या विशेष सामाजिक,शैक्षणिक,व साहित्य सेवे बद्दल इंटरनॅशनल प्राइड ऑफ पॅरिस हा मानाचा समजला जाणारा पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला.मॅडोनी
होसिन आणि निवड मंडळ सदस्य यांनी संजय निकम यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक केले.दि 21/5/2026 गुरुवार रोजी हा कार्यक्रम विशेष निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.संजीव गोयल,प्रिया ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
