
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६८ वा दिवस* आपले सगळे प्रयत्न जीवनातील शेवटची घटना जे मरण आहे. ते उद्यावर ढकलण्यासाठी चाललेले असतात. हे मृत्यो, तू नसता तर जगाने काय केले असते? सर्व दुःखांचा शेवट करणारा तू आहेस! हे जग ज्या स्वरूपात दिसते त्या स्वरूपात ते खरे नाही शाश्वत नाही, चिरकाल टिकणारे नाही. याबद्दलही ईश्वराचे आपण सर्वांनी आभार मानूया. भावी काळ अधिक चांगला कसा होऊ शकेल. तो तर वर्तमानकाळाचा परिणाम होय. म्हणून वर्तमान काळाहून अधिक वाईट जरी भविष्यकाळ नसला तरी तो वर्तमान काळासारखाच असेल. स्वप्न पाहत राहा! स्वप्नाची जादू हेच या जीवनाचे कारण आहे आणि तोच मुक्त होण्याचा उपायही आहे.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २४ आषाढ शके १९४७*
★ आषाढ वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १६ जुलै २०२५ ★ १९०९ थोर स्वातंत्र्यसेनानी, १९४२ च्या चले जाव चळवळीत त्यांनी मुंबई येथे तिरंगा फडकवला होता अशा भारतरत्न अरुणा असीफ अली यांचा जन्मदिन.
★ १९८६ इतिहासकार वासुदेव सिताराम बेंद्रे यांचा स्मृतीदिन.
★ २०२० महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचा स्मृतीदिन.
