
शिरसगाव (प्रतिनिधी ) दिनांक १५ जुलै २०२५ वार सोमवार रोजी रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा *शिरसगाव* येथे *लाल परीचे (बस)* आगमण झाले. शिरसगाव पंचकोशीतील पाडया व वाड्यावरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी पायपीट करत येत होते. विद्यार्थ्यांची दररोजची येण्या-जाण्याची अडचण लक्षात घेता शाळेचे मुख्याध्यापक दिपक भास्कर तसेच अधीक्षक अरुण बागले यांनी बस आगर प्रमुख यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थाच्या शिक्षणासाठी शालेय वेळेत बस सेवा सुरू करावी अशी सततची मागणी व पाठपुरावा करत असल्याने त्यांच्या विनंतीला मान्य करुन विद्यार्थ्यांची गरज ओळखुन आज पासून शालेय बस सेवा सुरु करण्यात आली. या शुभारंभ प्रसंगी वाहतूक नियंत्रक जयराम राऊत, लक्ष्मण टोंगारे , धनाजी कडवे, चालक बुदधमणी जोगदेडे, वाहक देवराम महाले व पंचवटी विभाग लिपिक प्रतिभा कोतवाल यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डेस्कालर विद्यार्थीनींना *अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना* अंतर्गत पास चे वाटप करण्यात आले. *या बसची सेवा सकाळी ठिक १०.०० वाजेपासून हरसुल* येथुन सुरुवात होऊन नांदुर्कीपाडा ,खडाडीपाडा,चिखलपाडा,निळूंबरपाडा, ते शिरसगाव आश्रमशाळा असा तर परतीचा प्रवास *शिरसगाव आश्रमशाळा येथुन संध्याकाळी ठिक ५.०० वाजेपर्यंत* असा असेल. या कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले,सिता भोये,अमोल कामडी, प.प्रा.शि. संदिप रूपनर, प्रा.शिक्षक मधुकर लहारे,अमोल कोपरेकर, शोभा जाधव, योगेश्वर चव्हाण, मनोहर लहारे, कनिष्ठ लिपिक किरण राऊत, तसेच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मुरंबी येथिल माध्यमिक शिक्षक श्रीराज अथिलकर, दशरथ वडाळ, प्रदीप शिंदे, दौलत लहारे, सुहास डोंगरे, सुहास अस्वले, संजय भोये, हेमलता मोरे ,डिंगबर महाले यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. बस सेवा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
