
दिंडोरी (प्रतिनिधी). विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती मंगला दामोदर बागुल यांनी सन 2025- 26 श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील महिंद्रा राजपक्षे स्टेडियम दियागाम येथे श्रीलंका इंटरनॅशनल ओपन मास्टर्स ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत चार मेडल प्राप्त केले. हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी विद्यालयास नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा महाराष्ट्र व देश यांसाठी बहुमान आहे. श्रीमती मंगला बागुल यांनी 400 मीटर शर्यत यात- सुवर्णपदक ,आठशे मीटर शर्यत यात रौप्यपदक, 200 मीटर शर्यत यात कांस्यपदक शंभर बाय चार रिले स्पर्धा यात कास्यपदक, असे सलग चार पदके पटकवून मराठा विद्या प्रसारक समाज संस्था व जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी यांचा नावलौकिक उंचावण्याचा बहुमान मिळवला याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. प्राचार्य शेजवळ एस .पी. यांनी त्यांचे कौतुक करताना म्हटले की,” माणसांमध्ये जिद्द, स्वाभिमान ,चिकाटी असली तर यश नक्कीच मिळते.
