
डुबेरे येथील जनता विद्यालयात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करताना श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे,सरपंच रामनाथ पावसे,मुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक उल्हास पवार व शिक्षक वृंद
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी) :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाने घवघवीत सुयश प्राप्त केले आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या. गौरी माणिक वाजे व आरोही भाऊसाहेब जाधव या दोन विद्यार्थिनींची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. सेक्टर सी मध्ये गौरी वाजे प्रथम तर आरोही जाधव हिने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना डी.ए.रबडे, सोमनाथ गिरी, रेवणानाथ कांगणे,सीमा गोसावी ,विनिता देवरे ,सुनिल ससाणे आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा विद्यालयाच्या वतीने सरपंच रामनाथ पावसे व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते .सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, तालुका संचालक कृष्णाजी भगत, संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके, शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे ,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने, गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, विस्तार अधिकारी कैलास सांगळे, डुबेरे केंद्रप्रमुख विजय निरगुडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक उल्हास पवार वरिष्ठ लिपिक राणी शिंदे,रोहिणी भगत,पोलीस पाटील रामदास वारुंगसे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे.
