
मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड येथील ओमकार संगीत विद्यालयात दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्व शिष्यांच्या वतीने गुरू पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे विद्यार्थी गायक आर्यन जोगदंड यांच्या यमन रागाने मैफिलीला उत्साहात सुरुवात झाली.आपल्या गायनाने सर्व संगीत रसिकांची मने जिंकत नंतर आदरणीय गुरुवर्य मा श्री सुनील खांगळ (पाटील) सर यांनी अनेक राग गाऊन दाखवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर गायक निवेदक श्री सोनू भुजंग सर,गायक देवेंद्र जी गवांदे सर,पायल खैरमोडे,मेघा ढोमसे, आदी गायकांनी पण आपल्या गायनातून गुरू महिमा वर्णिला. सदर कार्यक्रमासाठी मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयाचे ट्रस्टी आदरणीय विक्रम दादा सप्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच सदर कार्यक्रमात ख्यातनाम साहित्यिक कवी जनार्दन देवरे सर,शिक्षिका ज्योती पाटील व शिष्यगण आवर्जून उपस्थित होते.विद्यार्थिनी नेहल हिने तबल्यावर साथ संगत केली. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सर्वांनी गुरू पूजन करून.आदरणीय गुरुवर्य खांगळ सर यांचा आशीर्वाद घेतला.व शेवटी भैरवी ने मैफिलीची सांगता झाली. यावेळी सी.एम.जोहरे,सुनिला अहिरे,नेहल आरोटे,चंचल ढोमसे,योगिता खांगळ मॕडम,मिनाताई खांगळ इ.मान्यवर उपस्थित होते. ▪️
