
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस निरीक्षक समीर केदार, व्यासपीठावर उपसभापती मोगल, प्राचार्य दवंगे व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 12- सध्याच्या मोबाईल युगात मोबाईल रुपी सोशल मीडियाने मोठा धुमाकूळ घातला असून चांगल्या कामांपेक्षा वाईट कामांसाठीच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असून विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर त्यांनी सोशल मीडिया व अल्पवयीन वयात दुचाकी पासून दूर राहावे असे प्रतिपादन ओझरचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी केले ते मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांशी परिसंवाद साधत होते अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे उपसभापती श्री डी बी अण्णा मोगल होते यावेळी पोलीस निरीक्षक केदार यांनी विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच स्वयंपूर्ण व्हा, मोबाईलचा वापर करू नका, मुलांनी स्वतःची सुरक्षा घेणे गरजेचे असून मोबाईल पेक्षा मैदानावर खेळ खेळा, शाळेत कोणत्याही प्रकारची हत्यारांचा वापर करू नका, अमली पदार्थांपासून दूर राहा, मुलींची छेड काढू नका, वाहन चालवणे अल्पवयीन मुलांसाठी गुन्हा असून पालकांनी मुलांच्या हातात दुचाकी देऊ नये अन्यथा त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला जाईल, शाळेत शिस्त पाळा, मुलींनी अत्याचार सहन करू नका प्रसंगी आपल्या आईबरोबर व शाळेतील शिक्षिकांबरोबर संवाद साधून तक्रारपेटीचा वापर करा असे आवाहन केले यावेळी पोलीस निरीक्षक केदार यांचा संस्थेचे उपसभापती श्री डी बी मोगल व प्राचार्य रायभान दवंगे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य दवंगे यांनी शाळा सुटण्यापूर्वी व शाळा भरण्याअगोदर किमान पोलीस प्रशासनाने एक दोन फेरी मारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले यावेळी उपसभापती मोगल यांनी कसबे सुकेणे व परिसरातील समस्यांबाबत पोलीस निरीक्षक केदार यांच्याबरोबर संवाद साधला सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार प्राचार्य रायभान दवंगे यांनी मानले कार्यक्रमासाठी कसबे सुकेणे माजी उपसरपंच सौ अनुपमा जाधव,विधीतज्ञ ॲड निर्मला अरिंगळे, पोलीस पाटील आनंदा पवार,पर्यवेक्षक राजेश खताळ, कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे आदींसह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
