
नांदगाव ( प्रतिनिधी)- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या विद्यालयामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. सुरुवातीस वर्ग मंत्रिमंडळातील सर्व सदस्य एकत्रित करून त्यांना निवडणूक प्रक्रिया विषयी सूचना देण्यात आल्या त्यानंतर सर्व वर्ग प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रिया कशी होणार हे समजावून सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रिया मोबाईल द्वारे (इ.व्हि.एम.) घेण्यात आली. निवडणूक प्रक्रिया ही शालेय मंचावर सर्व शालेय विद्यार्थ्यांसमोर पारदर्शकपणे घेतली.

शालेय पंतप्रधान व उपपंतप्रधान पदाकरिता ४ उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी कुमारी वेदिका संजय जाधव हिला २३१ मते मिळाली तर कु. विराट गणेश पवार याला ५७ मते मिळाली. शालेय पंतप्रधान म्हणून वेदिका संजय जाधव तर शालेय उपपंतप्रधान म्हणून विराट गणेश पवार यांची निवड घोषित करण्यात आले.विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे व पर्यवेक्षक श्री अविनाश शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अशोक मार्कड ,श्री विजय देशमुख, श्री बाळासाहेब कवडे, श्री सुनील सुपेकर ,श्री शरद सातपुते श्री गोटे प्रणोद, श्री नरेंद्र पाटील, श्री भाऊसाहेब सोनवणे, श्री संदेश थोरात, श्री कपिल पवार ,श्रीमती निकम एस. डी. श्रीमती केदारे स्मिता,श्रीमती बिडवे मॅडम यांनी सदर निवडणुकीचे कामकाज पाहिले. शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेल्या सर्व सदस्यांना मविप्र तालुका संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील , विद्यालयाचा मुख्याध्यापिका ज्योती काळे व पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांनी अभिनंदन केले .पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने पूर्ण करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोलाचे सहकार्य लाभले.
