
सिन्नर (प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांच्या गुलामगिरीतून मराठी रयतेला सोडविण्यासाठी आपला स्वतंत्र बाणा असलेले स्वराज्य स्थापन केले. त्यावेळी त्यांनी गनिमी काव्याचा आधार घेताना गडकोटांना विशेष महत्त्व दिले . शत्रूपासून बचावासाठी देखील गडकोटांचे सहाय्य घेतले. गडकोटावर राहूनच भल्या भल्या शत्रूंचा देखील खात्मा केला व आपली राजधानी देखील रायगडावर उभी केली.आत्ताच युनुस्केच्या यादीमध्ये साल्हेर ,रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड , खांदेरी, सुवर्ण गड, पन्हाळा ,विजयदुर्ग ,सिंधुदुर्ग आणि जिंजी या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही निश्चितच आनंदाची बाब आहे. परंतु छत्रपती शिवरायांनी पुरंधर किल्ल्यापासून आपल्या पहिल्या आक्रमणाला सुरुवात केली. शहाजीराजांना अफजलखानाने अटक केल्यानंतर प्रति डाव म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदर पासून आक्रमणाला सुरुवात केली .तसेच छत्रपती शंभूराजे यांचा जन्म देखील पुरंदर किल्ल्यावरच झाला. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेला पुरंदरचा तह देखील ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. मामा पुरंदरचा युनेस्कोच्या यादीत समावेश होणे देखील महत्त्वाचे आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला हा मोगलांच्या प्रखर आक्रमणापुढे देखील कधीच झुकला नाही . रामशेज किल्ला देखील अजिंक्य राहिला.तसेच चाकणचा भुईकोट किल्ला शिवरायांनी आपल्या स्वराज्यात आणला व पुढे शाहिस्तेखानाला देखील तो मिळवताना खूप कष्ट घ्यावे लागले.असा ज्वलंत इतिहास असलेले हे तीन किल्ले युनेस्कोच्या यादीत यायला हवे होते. त्यासाठी भारत सरकारने पुन्हा एकदा पाठपुरावा करून युनेस्कोच्या यादीमध्ये हे तीन किल्ले किंवा आणखी काही महत्त्वाचे गडकोट सामाविष्ट करण्यासंबंधी प्रयत्न करावेत ही विनंती.प्रा.राजाराम मुंगसे.मो.7021832393
