
नाशिक (प्रतिनिधी ) -दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज शनिवार दि.१२/०७/२०२५ रोजी विज्ञान छंद मंडळाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी उद्घाटक म्हणून के.टी.एच.एम.कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ.किशोर पवार उपस्थित होते.सरस्वती पूजन व थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे यांचे शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.विज्ञान छंद मंडळाच्या प्रमुख सौ.चेतना टोपले मॅडम यांनी प्रास्ताविकातून विज्ञान छंद मंडळाचे उदिष्ट्ये सांगितले. विज्ञान विभाग प्रमुख सौ.मेघना देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रमुख पाहुणे डॉ.किशोर पवार सरांनी शालेय वैज्ञानिक माहिती व विविध उपक्रमाबाबत विचार व्यक्त केले.

तसेच विद्यार्थिनींनीमध्ये विज्ञान दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले व अंधश्रद्धा बाळगू नका डोळस व्हा विज्ञान दृष्टी ठेवून सुंदर सृष्टी निर्माण व्हावी असे आवाहन केले. विद्यार्थिनींनी व महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये ,यासाठी तुम्ही सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास करून स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन प्रा.डॉ.किशोर पवार यांनी विद्यार्थिनींना केले.विज्ञाननिष्ठ व्हा ,गुणवंत व्हा असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे यांनी दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीत विज्ञान असते.त्यातील कार्यकारण भाव समजून घ्या आणि खूप मोठे होऊन विज्ञाननिष्ठ बना असे सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.प्रकाशजी वैशंपायन ,उपाध्यक्ष मा.प्रभाकर कुलकर्णी , सेक्रेटरी मा.हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.रमेश महाशब्दे ,अधिक्षका सौ.मिना वाळुंजे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे ,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व ज्युनिअर काँलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे , पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कैलास बागुल यांचेसह सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.विज्ञान शिक्षका व छंद मंडळाच्या प्रमुख सौ.चेतना टोपले यांचेसह सौ.प्रतिभा महाजन,सौ.मेघना देशपांडे ,सौ.लता शिंदे सौ.मिनाक्षी दोंड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी विज्ञानगीत सादर केले.सूत्रसंचालन कु.मानसी पाटील हिने तर आभार सौ.लता शिंदे यांनी मानले. फलकलेखन कलाध्यापिका सौ.सायली मुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
