
सिन्नर प्रतिनिधी (सोमनाथ गिरी): – डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मविप्र संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर पर्यवेक्षक उल्हास पवार , पी.आर.करपे, सोमनाथ गिरी, सोमनाथ पगार,कचेश्वर शिंदे, वरिष्ठ लिपिक राणी शिंदे रोहिणी भगत , रामदास वारुंगसे ,विद्या ठाकरे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सर्वांचे औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पर्यवेक्षक उल्हास पवार यांच्यासह धनश्री ढोली ,रेणुका वारुंगसे,स्नेहा शिंदे,खुशी गोफणे, प्रेम कुरणे ,राजश्री साळवे या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा महिमा सांगितला.विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देवून शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांचा गौरव केला.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रंगनाथ उगले म्हणाले की, जीवनात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांनी गुरू-शिष्यच्या पवित्र नात्याविषयीचे महत्त्व माहिती दिली.जीवन जगत असतांना जी जी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करते .ती व्यक्ती आपली गुरू असते.तसेच जीवनात गुरुजन यांचा नेहमीच आदर ठेवा. चांगला अभ्यास करून यश मिळवा असे आव्हान उगले यांनी केले.वर्गशिक्षक सोमनाथ बोडके मार्गदर्शनाखाली इयत्ता-९ वी तु-अ च्या वर्गाने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. सूत्रसंचालन कुमारी गौरी वाजे व धनश्री वारुंगसे यांनी तर आभार आरोही जाधव हिने मानले.यावेळी डी.ए. रबडे,रेखा खंडीझोड, सीमा गोसावी, शिवाजी गुरुळे,किशोर शिंदे,रवि गोजरे, ऋषी कुंदे आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
