
नाशिक ( प्रतिनिधी ) नाशिक ता. महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच तर. तर्फे मातुदिनाच्या पार्श्वभुमीवर २८ मे रोजी दुपारी ३ वा ग्रामसेवक भवन संस्कार केद्र येथे जिल्यातील आदर्श माताचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष पुजा दंडगव्हाळ यांनी दिली.
इनरविल ग्रुपच्या अध्यक्ष व रोटरी हेल्थ सोसायटी च्या कार्याध्यक्ष शर्मिला मेहता, यांच्या शुभहस्ते, व नाशिक जिल्हा मध्यवर्ती ब बँकेच्या माजी उपाध्यक्ष निर्मलाताई खर्डे याच्या अध्यक्षतेखाली. ग्रामसेवक युनीयनचे अध्यक्ष प्रमोद ठाकरे, राज्य सरचिटणीस भारती निकम, जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, उपाध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. आदर्श माता सन्मान सोहळ्याचे हे ५ वर्षे आहे.
यंदाच्या या सोहळ्यासाठी, कलाबाई पवार कळवण, शेवंता बाई थवील सुरगाणा, शमा शेख इगतपुरी, अलकाताई दराडे नाशिक, प्रा. सुमती पवार नाशिक,रेश्माबाई देवरे चादंवड,सुमनबाई डंबाळे निफाड, नंदाबाई नवाळे, सुशीलाताई संकलेचा, सुलाबाई बोरसे त्रबंकेश्वर,सुमनताई डुबंरे सिन्नर,रत्नमाला दुधे नाशिक, कमळाबाई गवळी पेठ, लिलावती शेलार मालेगाव,फुलाबाई चौधरी दिडोरी,लताबाई शेवाळे सटाणा, सुशीला आहे देवळा,सुनीता महाले नादंगाव,चंद्रकला कोल्हे येवला या आदर्श माताचा सन्मान करण्यात येणार असून या भावस्पर्शी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच तर्फे करण्यात आले आहे.
