
राहुड (चांदवड) (भागवत झाल्टे) दिनांक 10/07/25 पाहाटे 05 वाजेच्या सुमारासचांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असून, अनेक पाळीव प्राण्यांवर आणि नागरिकांवरही बिबट्याने हल्ले केले आहेत.गौतम पुंडलिक कापडणी यांचा गट नंबर 459 मध्ये दोन वर्षाचा मादी बिबट्या पोल्ट्री फार्म करमदळे रोड माजी सभापती गणपतराव पवार यांच्या वस्ती जवळ 15 दिवसांपूर्वी या फार्ममध्ये घुसून बिबट्याने तब्बल 17 ते 18 कोंबड्यांचा फडशा पाडला होता. त्यामुळे याठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. राहड येथील त्या आधीही प्रकाश प्रकाश नाना पवार यांची गाय बिबट्याने फस्त केली होती. नुकतेच दिनांक 9 जुलै 2025 रोजी पहाटे 5 वाजता रामदास आंबू पवार यांची शेळी बिबट्याने फस्त केली. याशिवाय, काही दिवसांपूर्वी राहुड येथील वयोवृद्ध महिला सुशिलाबाई उत्तम कांडळ यांच्यावरही बिबट्याने थेट हल्ला केला होता. सुदैवाने त्या जीवितहानीपासून वाचल्या.ही गंभीर आणि धोकादायक स्थिती लक्षात घेता वन्य पशुप्राणी मित्र तसेच युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष श्री. गणपत पवार यांना ग्रामस्थांनी सविस्तर माहिती दिली.वन्य पशुप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी शासनाला यासंदर्भात निवेदन पाठवले असून, त्यांनी मागणी केली आहे की शेतकऱ्यांना दिवसा लाईट कनेक्शन उपलब्ध करून द्यावे. कारण रात्रीप्रमाणेच बिबट्याची हालचाल दिवसाही दिसून येत असून, अंधारामुळे धोका अधिक वाढतो. दिवसा लाईट उपलब्ध झाल्यास शेतकरी आपले शेतीकाम सुरक्षितपणे करू शकतील.या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ हालचाली करून पिंजरा लावण्याचे काम हाती घेतले असून, वनपरिक्षेत्राधिकारी विशाल कुटे, वनपाल एस. के. खंदारे, वनपाल वैभव गायकवाड, वनरक्षक पूनम सावळे, वनमजूर मंजूर भरत वाघ, अशोक शिंदे आणि इतर अधिकारी व कर्मचारी, तसेच स्थानिक गावकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.राहुड परिसरातील नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की बिबट्याच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात, अधिक पिंजरे लावण्यात यावेत, आणि वन्य प्राणी निरीक्षकांची संख्या वाढवण्यात यावी.स्थानिक नागरिक, वन्यप्राणी प्रेमी आणि सामाजिक संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून या संकटावर लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
