
नाशिक:-( प्रतिनिधी ) ज्येष्ठ कवी एकनाथ वाघ यांच्या पुणे येथील वैशाली प्रकाशन प्रकाशित ‘फिर्याद’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दि.३१ मे रोजी सायं.५.३०वा. सार्वजनिक वाचनालयाच्या मु.शं.औरंगाबादकर सभागृहात होणार आहे.
योगाचार्य अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. नाशिकरोड-देवळालीच्या आ.सरोज अहिरे, नगरसेवक वाळू काकड (पहिलवान), सुप्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी, ज्येष्ठ कवयित्री जयश्री साठे, प्रकाशक विलास पोतदार हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली प्रकाशन आणि एकनाथ वाघ मित्रपरिवार यांनी केले आहे.
