
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८३ वा दिवस
'तपस्' शब्दाचा धात्वर्थ आहे तापविणे वा गरम करणे. 'तप' ही आपल्या उच्च प्रकृतीला 'तप्त' वा उत्तेजित करण्याची विशिष्ट साधना वा एक विशिष्ट प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, सूर्योदयापासून तो सूर्यास्तापर्यंत दिवसभर मधे मुळीच खंड न पडू देता सतत एकसारखा ॐकाराचा जप करण्याचे व्रत घेणे हा तपाचा एक प्रकार आहे. ह्या साऱ्या क्रियांनी एक शक्ती जन्मत असते; त्या शक्तीला तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार आध्यात्मिक किंवा भौतिक कोणत्याही रूपात रूपान्तरित करू शकता. ही तपाचरणाची वा तपश्चर्येची भावना समस्त हिंदुधर्मात अगदी ओतप्रोतपणे भरून आहे. फार काय पण हिंदुलोक असेही म्हणत असतात की, ईश्वरालाही हे जग सृजन करण्यापूर्वी तप करावे लागले होते. ते एक विशिष्ट मानसिक साधन आहे -त्याने काय वाटेल ते साधता येणे शक्य आहे. शास्त्रात म्हटले आहे. 'तपाने अलभ्य असे ह्या त्रिभुवनातही काहीच नाही.'
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ६ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. २७ मे २०२६
★ कमला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा स्मृतीदिन
★ १९५१ मुंबई स्थित तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
★ १९६४ आधुनिक भारताचे शिल्पकार देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा स्मृतीदिन.
★ १९९४ महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा स्मृतिदिन.
