
निफाड ( प्रतिनिधी ) क्रीडा प्रबोधनी निफाड अयोजित’स्वराज्यरक्षक धर्मवीर राजे संभाजी महाराज’ जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न!युवकांनी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य संपादन करून नाशिक जिल्हयाला वैभव मिळवून दयावे…..उपनगराध्यक्ष अनिल पा.कुंदे निफाड /-क्रीडा प्रबोधिनी निफाड यांच्या वतीने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ‘जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा’ अत्यंत रोमांचक आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन निफाड चे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

त्यावेळी त्यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना आपल्या मनोगतातून इतर गोष्टी ऐवजी युवा पिढीने मैदानावर आपला वेळ द्यावा असे आवाहन केले.मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.जिल्ह्यातील तब्बल २४ मातब्बर संघांनी या स्पर्धेत आपला दमदार सहभाग नोंदवला होता. निफाडकर क्रीडाप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मैदानावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ब्रह्म आडगाव,द्वितीय क्रमांक ब्रह्मा आडगाव बी, तृतीय क्रमांक रुद्र सिन्नर चतुर्थ क्रमांक क्रीडा प्रबोधिनी निफाड यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे निफाड शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटनस्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना निफाडचे तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष अनिल अण्णा कुंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना आणि उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी “खेळाडूंनी छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर ठेवून मैदानावर शौर्य आणि खिलाडूवृत्ती दाखवावी,” असे मोलाचे मार्गदर्शन केले

.या क्रीडा महोत्सवासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संजय गाजरे, ज्येष्ठ मार्गदर्शक नंदलालजी काका चोरडिया, आणि क्रीडाप्रेमी तसेच कुंदन हॉटेलचे संचालक स्वप्निल दादा गोळे व भीमराव काळे, विलास निरभवणे, राजेंद्र सोमवंशी, यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच ही स्पर्धा भव्य स्वरूपात साकारता आली.युवा कार्यकर्त्यांचे अचूक नियोजन आणि अथक परिश्रम स्पर्धेचे मुख्य आयोजक दत्तू रायते, विलास गायकवाड , चेतन कुंदे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. स्पर्धा शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमोल अहिरे, आदित्य सूर्यवंशी, आणि साजिद शेख,अजय मेधने,शिवकुमार बोरगुडे,संकेत खताळेअमोल देवकर,संकेत बोरगुडे,मितेश जाधवनिलेश पगारे,सोनू मंडलिक,विकास मुरकुटे,पियुष यादव,सोनू महतो,अनमोल यादव,सदा कांदळकरसंस्कार वघुले,अमित निकम,साहिल केदारे,ऋषीकेश गडाख या युवा कार्यकर्त्यांनी व क्रीडाप्रेमींनी अहोरात्र कष्ट घेतले.निफाड नगरीत या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि ऐतिहासिक पद्धतीने पार पडल्या. या यशस्वी आयोजनामागे निफाड तालुक्यातील समस्त ग्रामस्थ, नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि क्रीडा रसिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे सहकार्य आम्हा आयोजकांसाठी एका आशीर्वादासारखे आहे, अशा भावना क्रीडा प्रबोधनीच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या. शेवटी, क्रीडा प्रबोधनी निफाड परिवाराच्या वतीने या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ, क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यात आले. “नेत्रदीपक नियोजन आणि खेळाडूंचा उत्साह! क्रीडा प्रबोधनी निफाडचे अध्यक्ष दत्तू रायते आणि विलास गायकवाड यांच्या अचूक नियोजनाच्या जोरावर या स्पर्धेने यशाचे एक नवे शिखर गाठले.” सूत्रसंचालन विलास गायकवाड यांनी केले तर आभार दत्तू रायते यांनी आभार मानले.
