
साकोरे (प्रतिनिधी ) आज गुरु पौर्णिमा निमित्त विद्यालयात गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता ८ वी च्या वर्गाने केले वर्गशिक्षक बोरसे ए आर यांनी प्रास्तविक केले . प्रमुख पाहूने विद्यालयाचे माजी विद्यार्थी नरेद्र बोरसे युवा उद्योजक नासा अँक्वा साकोरे व विद्यार्थी पालक योगेश वाघ हे उपस्थित होते . यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व केले .त्यांंचा मुख्याध्यापक व सर्व सेवकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते .यावेळी नरेद्र बोरसे यांनी गुरुपौर्णिमा निमित्त जिवनात गुरुजन यांचे महत्त्व विषद केले . गुरु अनुभवाने मिळतो उलगङतो कधी कधी पुस्तक , एखाद्या चुकीतून , एखादी ठोकर सुध्दा तुमचा गुरु ठरु शकते हे विषद केले .नरेद्र बोरसे यांनी विद्यालयास स्पिकर सेट देण्याचे घोषित केले.अध्यक्ष भाषणात योगेश पाटील यांनी जीवनात नेहमी शिष्यत्वाची जाणीव होणे हाच खरा गुरु भेटण्याचा पहिला टप्पा असतो हे सांगितले . यावेळी यशश्री बोरसे , प्रमोद गावीत , स्नेहल अनिकेत , पार्थ , मानवी , गौरव , शर्वरी , समृद्धी या विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी आपल्या मनोगता मधून पुष्प गुंफले . कार्यक्रमा चे सुञसंचलन अनन्या बोरसे व आभार समृद्धी बोरसे वआभार अर्पिता हिने केले.
