
नांदगाव (.प्रतिनिधी ) श्रीमान टी.जे.चौहान माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहा साजरी करण्यात आली. प्रथम माननीय मुख्याध्यापिका सौ.उज्वला माळी मॅडम व सौ.शहाणे मॅडम यांनी प्रतिमा पूजन केले. या निमित्ताने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम फेरीतून अंतिम फेरीसाठी आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमे निमित्त आपल्या जीवनातील गुरुचे महत्त्व व गुरु- शिष्य विषयक गोष्टी परीक्षाकांसमोर सादर केल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक- वैष्णवी महाजन, द्वितीय क्रमांक नवले पार्थ , तृतीया क्रमांक-दुघड तनुष्का यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ बक्षीस ईघारे स्नेहल ईला मिळाले. माननीय मुख्याध्यापिका व परीक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका ,पर्यवेक्षक व इयत्ता सहावीचे वर्गशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
