
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८२ वा दिवस
या मातृभुमीचे आपण पुत्र आहोत, या संस्कृतीचे आपण वारस आहोत, या राष्ट्राचे आपण एक जबाबदार घटक आहोत. म्हणूनच या देशाशी, भूमीशी, समाजाशी आपण सदैव कृतज्ञ असले पाहिजे. यांचे ऋणी असले पाहिजे. व्यक्तीशः आणि संघटितरीत्या आपल्या सर्वांना हे ऋण फेडावयाचे आहे. असे जर आपण केले नाही तर आपण माणूस म्हणून घेण्यास लायक नाही. आपली गणना पशुमध्येच करावी लागेल. आपला देश, आपली संस्कृती, आपला समाज आज संकटात आहे. आपण काही वेळीच केले नाही तर, देशाची पातळी घसरेल, संस्कृती दुर्बल होईल, समाजामध्ये भेद निर्माण होतील. असे झाले तर आपली सांस्कृतिक मूल्ये नष्ट होतील.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ५ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २६ मे २०२६
★ १८८५ सुप्रसिध्द मराठी नाटककार, विनोदकार, कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन.
★ १९४५ माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्मदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
