
नांदगाव { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव गुरुपौर्णिमा म्हणजे महर्षी व्यास यांची जयंती (व्यास पौर्णिमा)साजरी करण्यात आली. मंचावर माननीय मुख्याध्यापिका, माननीय पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माननीय मुख्याध्यापिका काळे मॅडम,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. सर्व मान्यवरांचे प्रतिक म्हणून मा.मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी ममता जैन हिने पाद्यपुजन केले . त्यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्प व पेन देऊन विद्यार्थ्यांनी सन्मान केला. गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यालयातील आरुषी बोरसे, गौरी सोनवणे, वेदश्री महाजन, स्वरा गायकवाड, कस्तुरी कुलकर्णी या विद्यार्थिनींनी गुरुप्रती आपला आदरभाव व्यक्त केले. श्री खालकर सर यांनी आषाढ महिन्यातील पहिली पौर्णिमा म्हणजेच महर्षी व्यास जयंती व गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा) असते.तसेच महाभारत हे महाकाव्य महर्षी व्यास रचित आहे हे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीमती काळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये गुरूचे स्थान किती महत्त्वाचे आहे समजावून सांगितले. तसेच गुरु शिष्य नाते कसे असावे हे उदाहरणातून स्पष्ट केले. मविप्र संस्थेचे तालुका संचालक आदरणीय श्री आमित भाऊ बोरसे पाटील यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ममता जैन व वेदिका जाधव यांनी कले*
