
रोहिले( बु).(प्रतिनिधी ) संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित माध्यमिक विद्यालय रोहिले येथे गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ जे. एस. जाधव मॅडम यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे श्री. सय्यद सर हे होते. या कार्यक्रमात श्री सोनवणे सर श्री निकम सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जाधव जे डी सर यांनी केले.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरु विषयी असलेला आदरभाव आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.

