
निगडोळ :- येथील रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलात गुरुवार दि.१० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार कला,क्रिडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख वाघमारे ए.बी.यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.अध्यक्षस्थानी मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.होते.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पुष्पगुच्छ देऊन गुरुंचा सन्मान केला.विद्यार्थ्यांनी गुरुंविषयी आपल्या शब्दांतून कृतज्ञता व्यक्त केली.जेष्ठ शिक्षिका गायकवाड पी.व्ही.जेष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.बेद्रे एस.व्ही.वाघमारे ए.बी.यांनी मनोगत व्यक्त केले.’मंदिर हे भक्ती तर ज्ञानमंदिर हे विचार शक्तीचे उगमस्थान आहे’ असे कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरसे डी.डी.यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विशद केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इ.१०वी च्या विद्यार्थीनी ऋतुजा वाघ व समृद्धी सोनवणे यांनी केले.आभार प्रदर्शन पंकजा गायकवाड हिने केले.
