
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या ‘मागे वळून पाहताना’ या अनोख्या कार्यक्रमात अनुभव कथन करताना माधवी कुलकर्णी
नाशिकरोड:- (प्रतिनिधी ) शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने ‘मागे वळून पाहताना’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत आपल्या अनुभवांचे कथन केले. सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना वैद्य यांनी शालेय अध्यापनात आलेले विविध प्रसंग आपल्या खुमासदार शैलीत सांगितले. सुधाकर सोनवणे या़ंनी अमेरिका वारीतील वेगळे अनुभव सांगितले. माधवी कुलकर्णी यांनी स्वतःच्या अपघाताचे वर्णन करत पतीने दीनानाथ हाॅस्पिटलमध्ये रिक्षाचालकांच्या मदतीने भरती केले आणि घेतलेली काळजी यांचे वर्णन केले.

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या ‘मागे वळून पाहताना’ या अनोख्या कार्यक्रमात अनुभव कथन करताना माधव कुलकर्णी.
दीपाली भिंगारकर यांनी यात्रा कंपनीबरोबर अनुभवलेल्या चंदिगढ येथील सहलीचा वृत्तांत कथन केला. दिलीप भिंगारकर यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. मोहन कुलकर्णी यांनी शालेय जीवनातील प्रसंग सांगितले. अध्यक्ष वैदेही कुलकर्णी यांनी सभासदांच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे भाषणात कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपखजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, राम कुलकर्णी, सदानंद पालकर, श्रीपाद शास्त्री, वसंत उपासनी, वैजयंती चंद्रात्रे,मेखला रास्वळकर, ज्योती जोशी, शालिनी डहाळे, मृणाल प्रभुणे यांनी विशेष परिश्रम घेतले. रवींद्र चंद्रात्रे यांनी प्रार्थना सादर करीत सूत्रसंचालन केले. सुनंदा गोसावी यांनी आभार मानले.
