
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९६२ वा दिवस
"गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे, जो आम्हाला स्वः ची खरी ओळख करून देतो".
*स्वामी विवेकानंद...*
वीर हनुमानाचा विचार केल्याशिवाय आपल्याला प्रभु श्रीरामचंद्रांचा विचार करता येत नाही, तसेच अर्जुन- श्रीकृष्ण, बुध्ददेव-आनंद, येशू ख्रिस्त-सेंट पॉल आदी गुरु-शिष्य परंपरेची उदाहरणे देता येतील. एकाचा नामोल्लेख केला असता, ओघानेच दुसऱ्याचे नाव सहज मुखात येते. श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद या गुरु-शिष्यांचा संबंध अशाच प्रकारचा आहे, कारण श्रीरामकृष्ण हे मूळच्या झऱ्यासारखे असून स्वामी विवेकानंद हे या झऱ्याचे पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहासारखे आहेत.
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १९ आषाढ शके १९४७
★ आषाढ पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १० जुलै २०२५
★ व्यासपौर्णिमा, गुरुपौर्णिमा.
★ ‘महाभारत’ या महाकाव्याचे रचनाकार महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास यांचा जन्मदिन.
★ १९२३ साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुढकथालेखक गुरुनाथ आबाजी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
★ सुप्रसिध्द क्रिकेटपटू, समालोचक, लिटल मास्टर, “सनी” सुनिल मनोहर गावसकर यांचा जन्मदिन.
★ मातृ सुरक्षा दिन.
★ अखण्डमण्डलाकांर व्याप्तं येन चराचरम्।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।
अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानार्जन शलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥
★ गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी समस्त गुरु-शिष्यांना माझा साष्टांग दंडवत, सादर प्रणाम.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
