
वडांगळी…(प्रतिनिधी). येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल वडांगळी या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रकाश नंदू खुळे याने वाणिज्य शाखेत पदवी मिळून दोन वेळा सीए ची परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नात तो सी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाला.

या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन भाऊ ठाकरे साहेब, सिन्नर तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांनी त्याचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश दादा खुळे हे होते.सुदेश दादा खुळे यांच्या शुभहस्ते प्रकाश खुळे यांचा सी ए झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार यांनी केले. यावेळी त्यांनी प्रकाश खुळे यांचे सी ए च्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक बाळासाहेब खैरनार, प्रकाशचे काका मधुकर बंडू खुळे,प्रणव दीपक खुळे, अक्षय सुरेश खुळे, कुणाल कदम, पर्यवेक्षक मच्छिंद्र धातडक, सुभाषराव ठोक, मधुकर बागुल, विजय कोकाटे आदी उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना अध्यक्ष सुदेश दादा खुळे म्हणाले की प्रकाश खुळे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये नाशिकच्या एका नामांकित सीए च्या फर्म मध्ये काम करून सीए च्या परीक्षेचा अभ्यास केला.या परीक्षेत त्याला दोनदा अपयश आले परंतु जिद्द व चिकाटी न सोडता त्याने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवून वडांगळी गावातील पहिला सीए होण्याचा बहुमान मिळवला त्याच्या या यशाबद्दल त्यांनी त्याचे अभिनंदन केले. व त्याला साथ देणाऱ्या त्याच्या आईचे देखील कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब सांगळे यांनी केले. आभार संदीपराव म्हस्के यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
