
श्री अरबाज पठाण
.सावरगाव (वार्ताहर श्री जगदीश कुशारे )– निफाड तालुक्यातील युवा उत्साही आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे श्री अरबाज पठाण यांची भारतीय जनता पार्टी च्या युवा मोर्चाच्या निफाड तालुका पिंपळगाव मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजपा तालुका अध्यक्ष पिंपळगाव मंडळ मयूर भाऊ गावडे यांनी पत्राद्वारे अधिकृत घोषणा केली पठाण यापूर्वी जिल्हा युवा मोर्चा चिटणीस अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य होते संघटना व पक्ष कार्य त्यांचे विशेष योगदान आहे त्यांची दखल घेत सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिली आहे पठाण यांची मा केंद्रीय मंत्री भारतीताई पवार भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम प्रदेश युवा मोर्च सरचिटणीस योगेश दादा, सतीश मोरे, वैकुंठ पाटील सचिन दराडे बापुसाहेब पाटील मयुर गावडे संजय गाजरे अल्पेश पारख, लक्ष्मण निकम, सारीकाताई डेर्ले, अमृता ताई पवार जगदीश कुशारे सुनील घेगडे अभय बलदोटा, विष्णू ढोमसे दत्ता आरोटे समाधान थेटे पवन जाधव आदींनी अभिनंदन केले.
