
.येवला ता. 10 : अंदरसुल जि.प. आदर्श मुलींच्या शाळेचा गुणवत्तेचा आलेख वाढता असून शाळा राज्यात आदर्श ठरावी अशीच आहे. शाळेत बोलली जाणारी मराठी भाषेबरोबरच जपानी भाषा, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. असे मत अध्यक्ष स्थानावरून बाळासाहेब लोखंडे साहेब यांनी व्यक्त केले. डिजिटल शाळा अंतर्गत या शाळेला रोबोटिक लॅब, सायन्स लॅब, आयडियल कम्प्युटर सेंटर लॅब उपलब्ध असून त्याचा उपयोग नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी होणार आहे. विज्ञान आणि भाषा विकास प्रयोगशाळा या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्तेची कास धरत आहे. ही शिक्षण विभागासाठी भुषणावह बाब आहे. असे मत येवला तालुक्याचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी व्यक्त केले. गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी , ग्रामपालिका, ग्रामस्थ यांचे शाळेला असलेले सहकार्य आणि विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांच्या असलेला प्रामाणिकपणाचे हे फळ आहे. असे मत यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर यांनी व्यक्त केले. ता. 9 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा अंदरसुल मुली येथे मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब (अन्न व नागरी पुरवठा मंत्री) आणि मा.ना.दादाजी भुसे साहेब ( शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या विशेष प्रयत्नातून अंदरसुल मुली शाळेला नवीन आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाल्यामुळे मा.ना.छगनरावजी भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते इयत्ता आठवीच्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी इयत्ता आठवीच्या वर्गाची बारा वर्षांची प्रतीक्षा संपल्याचे समाधान सर्व पालक व ग्रामस्थांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाला माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन आप्पा सोनवणे, मार्केट कमिटी मा.सभापती किसन काका धनगे, मार्केट समिती मा.सभापती मकरंदभाऊ सोनवणे,गटविकास अधिकारी संदिप वायाळ, शिक्षणाधिकारी संजय कुसाळकर ,केंद्रप्रमुख.नारायण डोखे, सरपंच .लताताई जानराव,नवनियुक्त उपसरपंच अमोल सोनवणे,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सुनील देशमुख, गणेश कासार, ग्रामपंचायत सदस्य योगेश जहागीरदार, भाऊसाहेब कचरे, एकनाथ जानराव, किशोर बागुल, इंडियन गॅस संचालक दीपक जगताप, जगन्नाथ जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयश्री माळी, पूनम गायकवाड, रूपाली खानदेशी, अशोक घोडेराव, ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदि मान्यवर ग्रामस्थ पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगळ, शिक्षक विलास जानराव, मुक्तानंद सोमासे, किशोरी नाकोड, सुमित्रा दातीर, जयश्री पालवे, मनीषा कंठाळे, अंशकालीन निदेशक गरुड, कांडेकर यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन आशा वर्पे तर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
