
मनमाड (प्रतिनिधी). नांदगाव व मनमाड शहरातील सीटू संलग्न युनियन व किसान सभा यांच्या वतीने श्रम सहीता कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आल्यानंतर एकात्मता चौक मनमाड येथे शासनाचे प्रतिनिधी म्हणून सर्कल ऑफीससर श्री गुळवे साहेब यांना निवेदन देण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड विजय दराडे.कॉ.रामदास पगारे.कॉ.कमलाकर पगारे कॉ.धर्मराज शिंदे.कॉ.संजय सावंत. तसेच सीटू व किसान सभा यांनी केले या वेळी शहरी ग्रामीण भागातील लढाऊ पुरुष महीला मोठ्या संख्येने सहभागी होते.
