
सायखेडा (प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेत सायखेडा महाविद्यालयाच्या बोट क्लब ची दमदार कामगिरी १६ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय कॅनोईंग अणि कयाकिंग व ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धा-2025 ची, सांगली जिल्हा (बिरनाळ तलाब जत ) येथे शुक्रवार दि. ०४ जुलै २०२५ ते रविवार दि. ०६ जुलै २०२५ या कालावधीत पार पडल्या यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. श्रुती ताजने, कु. धनश्री मोगल, कु. साक्षी गोडसे व कु. संजना दीक्षित यांनी कयकिंग K-4 200 मी या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच कु. संजना दीक्षित व कु श्रुती ताजणे यांनी (K-2)200 मी मध्ये महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला या यशाने महाविद्यालयाचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे प्रसंगी विजयी खेळाडूंचे, माविप्र निफाड तालुका संचालक श्री. शिवाजी आप्पा गडाख यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रसंगी शाखेच्या अध्यक्षा श्रीमती निलिमाताई खर्डे, श्री नारायण वरखेडे, श्री टर्ले लक्ष्मण,. श्री त्र्यंबक शिंदे ,, श्री शांताराम हांडगे ,श्री गोपाळ रायते, श्री भास्कर डेर्ले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एम . खालकर, उपप्राचार्य डॉ एस. व्ही. गोसावी ,डॉ.डी.डी.काजळे, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तसेच खेळाडूंचे मार्गदर्शक शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. सुनील धोंडगे व अरुण दराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
